Marathi News> मनोरंजन
Advertisement

आईची साडी अन् मराठी प्रेम..! राज कपूर विशेष योगदान पुरस्कार स्वीकारताना काजोल झाली भावूक

काजोलचा आज (5 ऑगस्ट 2025) 51 वा वाढदिवस असून तिच्यासाठी आजचा दिवस अतिशय अविस्मरणीय झाला. अभिनेत्रीला  महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राजकपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

आईची साडी अन् मराठी प्रेम..! राज कपूर विशेष योगदान पुरस्कार स्वीकारताना काजोल झाली भावूक

महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी देण्यात येणारा 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळा मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थितीत होते. गेल्या 33 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं विशेष योगदान देण्यासाठी राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोलला देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री भावूक झाली. (Kajol wore her mother Tanuja saree Marathi love Kajol gets emotional while accepting Raj Kapoor vishesh yogdan puraskar maharashtra award)

काजोल पुरस्कारात किती रक्कम देण्यात आली?

आज अभिनेत्रीचा 51 वा वाढदिवस असल्याने तिच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास ठरला. अभिनेत्रीला प्रतिष्ठित पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि सहा लाख रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. 

काजोलने पुरस्काराची वेळी कोणाची साडी नेसली होती?

या पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री तिची आई आणि अभिनेत्री तनुजा सोबत होत्या. लेकीचं कौतुक करण्यासाठी त्या खास करून उपस्थितीत होत्या. काजोलही हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी खास साडी नेसून आली आहे. तिने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आईची साडी परिधान केली होती. ज्यात काजोल अतिशय सुंदर दिसत होती. लेकीला पुरस्कार स्वीकारताना पाहून अभिनेत्री तनुजा यांच्या चेहऱ्यावरील आनंद झळकत होता. तर काजोलही पुरस्कार स्वीकारताना आईकडे पाहून भावूक झाली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलने मराठी व्यक्त केल्या भावना!

काजोलने मराठीमध्ये मनोगत व्यक्त करत असे म्हटले की, 'नमस्कार सगळ्यांना, आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे या मंचावर उभी आहे, इतक्या मोठ्या लोकांसमोर... अनुपमजी माझ्या वतीने खूप छान बोलले आहेत. यानंतर मी काय बोलू?' 'आज एवढं नक्की सांगेन, माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. कारण, माझ्यासोबत माझी आई इथे उपस्थित आहे. मी माझ्या आईची साडी नेसले आहे आणि माझ्या आधी तिला हा पुरस्कार मिळाला होता. जसं मी म्हटलं माझ्या वाढदिवशी मिळालेला, यापेक्षा मोठा पुरस्कार असूच शकत नाही की, आज मी मंचावर उभी आहे.'

Read More