Marathi News> मनोरंजन
Advertisement

Secret Wedding करत काजोलच्या बहिणीने कोणासोबत बांधली लग्नगाठ?

कोण आहे मुलगा?  

Secret Wedding करत काजोलच्या बहिणीने कोणासोबत बांधली लग्नगाठ?

मुंबई : अभिनेत्री काजोलची बहिण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी तनीषा मुखर्जी कायम सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री म्हणून तनीषा प्रसिद्ध नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणारी तनिषा लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे. फोटोमध्ये तिने फक्त स्वतःचे पाय दाखवले आहेत. तिचे फोटो पाहून तुम्ही देखील कोड्यात अडकले असाल. 

तनिषाने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे पाय दिसत आहेत. तनिषाने पायांच्या बोटात जोडवी घातल्या आहेत. भारतीय समाजात स्त्रिया लग्न झाल्यावर पायात जोडवी घालतात. तनिषा मुखर्जीचे हे फोटो पाहून चाहते तिला सतत विचागर आहेत ती तू लग्न केले आहे का?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

युजर्स तनिषाच्या फोटोंवर सतत कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की तिने गुपचूप लग्न केले आहे का? एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, ' तनिषा मुखर्जी तू लग्न केले आहे का? पायात जोडवी घातल्या आहेत.?’

तनिषाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, काजोलची बहीण असूनही ती यशस्वी अभिनेत्री बनू शकली नाही. चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर तनिषा टीव्ही विश्वाकडे वळली पण तिथेही तिला यश मिळाले नाही. पण आता तनिषा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. 

Read More