Marathi News> मनोरंजन
Advertisement

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समंथाच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर, 'या' आजाराने ग्रस्त!

Kalpika Ganesh On Samantha Health: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या यशोदा चित्रपटाच्या (Yashoda Movie) सक्सेस मीट इव्हेंटच्या निमित्ताने कल्पिका गणेश (Kalpika Ganesh) यांनी समंथाबाबत मोठा खुलासा केलाय.

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समंथाच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर, 'या' आजाराने ग्रस्त!

Samantha Health Update: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सामंथाला मायोसिटिस (Myositis) नावाचा या दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे आता तिचे चाहते चिंतेत असल्याचं दिसतंय. काही महिन्यांपूर्वी मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार (samantha autoimmune condition) झाल्याची माहिती समंथाने दिली होती. त्यानंतर आता तिच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या यशोदा चित्रपटाच्या (Yashoda Movie) सक्सेस मीट इव्हेंटच्या निमित्ताने कल्पिका गणेश (Kalpika Ganesh) यांनी समंथाबाबत मोठा खुलासा केलाय. मी देखील याच आजाराने ग्रस्त असल्याचं कल्पिकाने सांगितलं. समंथा सक्सेस मीट इव्हेंटला हजर राहिली नसल्याची माहिती तिने दिली. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.

आणखी वाचा - Samantha Ruth Prabhu: काय आहे मायोसिटिस आजार, ज्याचा अभिनेत्री समांथा करतेय सामनाकाय म्हणाली कल्पिका गणेश?

"आम्हा सर्वांना सामंथाची आठवण येते. कल्पिकाच्या आजाराचा पहिला टप्पा आहे आणि समंथा तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. मी या समस्येबद्दल समंथाशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या समस्येचे फोटो पोस्ट करत असते", असं  कल्पिका गणेश (Kalpika Ganesh) म्हणाल्या आहेत.

पाहा Samantha ची पोस्ट -

दरम्यान, मायोसिटिस (myositis samantha) हा आजार दुर्धर आजार आहे. या आजारामुळे प्रचंड थकवा जाणवतो. शरिरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं हा आजार होण्याची शक्यता असते. विशेषता 30 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये हा आजार दिसून येतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पोषक आहार घेणं फायद्याचं ठरतं.

Read More