Marathi News> मनोरंजन
Advertisement

इरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत

सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय. 

इरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत

मुंबई : सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय. 

सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त पोस्ट... ही खरी तर कमाल राशिद खान याची ओळख... पण, सध्या हा अभिनेता कॅन्सरशी झगडतोय. एक प्रेस नोट प्रसिद्ध करून कमालनं स्वत:च ही माहिती दिलीय. आता त्यानं प्रसिद्ध केलेल्या या पोस्टची सत्यता तोच जाणे... परंतु, ही पोस्ट मात्र केआरकेच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलीय, एव्हढं मात्र खरं...

@KRKBoxOffice नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून कमालनं आपल्याला थर्ड स्टेजचा पोटाचा कॅन्सर असल्याचं सांगितलंय. आपण जास्तीत जास्त २-३ वर्ष जगणार असल्याचंही त्यानं यात म्हटलंय. आता मी कुणाचा फोन उचलणार नाही, कारण मला हे कुणी मी लवकरच मरणार आहे हे सांगू नये... मी कुणाच्या दययेवर एक दिवसही जगू इच्छित नाही. मी त्या लोकांचा सन्मान करतो जे मला पहिल्यासारखंच शिव्या देतील, राग करतील, प्रेम करतील... जसं एका नॉर्मल व्यक्तीसोबत केलं जातं, असंही त्यानं आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय. 

fallbacks
कमाल राशिद खान

 

या पोस्टमध्ये त्यानं आपल्या दोन अंतिम इच्छाही व्यक्त केल्यात. 'माझ्या केवळ दोन इच्छांसाठी मी दु:खी आहे. पहिली, मी ए ग्रेड सिनेनिर्माता बनू इच्छितो... आणि दुसरी म्हणजे मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करू इच्छितो. या माझ्या दोन इच्छा कदाचित माझ्यासोबतच मरतील. पण मी माझ्या कुटुंबीयांसोबत उरलेलं आयुष्य व्यतीत करू इच्छितो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि राग करणाऱ्या माझ्याकडून खूप प्रेम' असंही त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

केआरकेच्या या अकाऊंटवर जवळपास १३६ हजार फॉलोअर्स आहेत. कमाल खान स्वत:ला एक चांगला फिल्म समीक्षकही म्हणवून घेतो. 
  

Read More