Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुंबई पोलिसांकडून कंगना आणि रंगोलीला समन्स

वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या बहिणींच्या  आडचणीत वाढ  

मुंबई पोलिसांकडून कंगना आणि रंगोलीला समन्स

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहिण कायम कोणत्याही मुद्द्यावर आपलं परखड मत मांडतात. नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या बहिणींच्या  आडचणीत वाढ असल्याचं दिसून येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना कामय चर्चेत होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोलीला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार २६ आणि २७ ऑक्टोबरला दोघींना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ ((अ) १५३  (अ) आणि १२४ (अ) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. कास्टिंग दिग्दर्शक साहिल अशरफ सैयद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  

मध्यंतरी कंगनाने एक ट्विट केलं. कंगनाचं ते ट्विट चिथावणीखेर असल्याचं सांगत साहील अशरफ सैयद यांनी तिच्याविरोधत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली. कंगना सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचं सांगत आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्हाला माझी फार आठवण येत आहे. मी लवकरच तिकडे येणार आहे.' असं ट्विट तिने केलं आहे. 

Read More