Marathi News> मनोरंजन
Advertisement

मनालीत कंगणाने घेतला सुंदर बंगला....

नवीन वर्षात लोक एकमेकांना गिफ्ट देतात.

मनालीत कंगणाने घेतला सुंदर बंगला....

नवी दिल्ली : नवीन वर्षात लोक एकमेकांना गिफ्ट देतात. मात्र बॉलिवूड क्वीन कंगना राणावतने नववर्षात स्वतःला एक गिफ्ट दिले आहे. मात्र तिचे हे गिफ्ट पाहून तुम्ही थक्क व्हाल. कंगनाने गृहनगर हिमाचल मधील मनालीमध्ये एक सुंदर बंगला खरेदी केला आहे. स्वप्नवत वाटणारा हा बंगला अतिशय सुंदर आहे.

स्वप्नपूर्तीकडे वाटचाल

२०१६ मध्ये ती म्हणाली होती की, ती पुन्हा गृहनगरला जाऊ इच्छिते. आपल्या मुळ गावी राहून काम करू इच्छित आहे. आपल्या या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी कंगनाने बंगला घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.

कंगणा राणावतच्या फॅन क्लबने तिच्या या सुंदर बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा बंगला पहाड्यांच्या कुशीत वसला आहे. पहा कंगणाच्या घराचे काही फोटोज...

fallbacks

fallbacks

(फोटो सौजन्य - @KanganaFanClub/Twitter)

मुंबईच्या घराचे फोटोजही व्हायरल 

गेल्या वर्षी कंगणाच्या मुंबईच्या घराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कंगणाने ते ही घर अतिशय फंकी स्टाईलने फार सुरेख सजवले आहे. 

कंगणा शूटिंगमध्ये व्यस्त

कंगणा राणावत सध्या आपल्या आगामी चित्रपट 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे लेखन बाहुबलीच्या लेखकाने केले आहे. 

Read More