Marathi News> मनोरंजन
Advertisement

PHOTO : मोदींच्या विजयानंतर कंगनाचं हिमाचलमध्ये खास सेलिब्रेशन

मोदींसाठी कंगनाच्या खास शुभेच्छा...

PHOTO : मोदींच्या विजयानंतर कंगनाचं हिमाचलमध्ये खास सेलिब्रेशन

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये जनतेने पुन्हा एकदा भाजपा सरकारला प्रचंड बहुमताने विजयी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी देशभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं जात आहे. देश-विदेशासह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही मोदींचं त्यांच्या विजयासाठी अभिनंदन केलं आहे. बॉलिवूड क्विन कंगना रनौतनेही आपल्या कुटुंबासह हिमाचलमध्ये हा विजय साजरा केला आहे. कंगना सध्या तिच्या हिमाचलमधील घरी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कंगनाने पंतप्रधान मोदींचा विजय साजरा करत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची बहिण आणि कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत. कंगनाव्यतिरिक्त तिची बहिण रंगोलीनेही आपल्या ट्विटरवरुन फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये कंगना भजी तळताना दिसत आहे. मोदींच्या विजयाने अतिशय आनंदी असल्याचं तिने म्हटलंय.

कंगना आणि रंगोली नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावरुन चर्चेत असतात. अनेकदा रंगोली तिच्या बहिणीची कंगनाची बाजू घेतानाही दिसते. अभिनेता हृतिक रोशन वादाप्रकरणीही दोघी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. 

लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री जुही चावलानेही 'हर बार मोदी सरकार' असं म्हणत मोदींचं अभिनंदन केलं आहे. 'भारताला ताकदवान बनवण्यासाठी हे गरजंचं होतं' असं म्हणत दबंग खान सलमाननेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More