Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : लॉस एन्जेलिसमध्ये कंगनाचं 'दिवाळी सेलिब्रेशन'

कामाच्या व्यापातून वेळ काढून कंगनानंही आपल्या सिनेमाच्या टीमसोबत दिवाळी साजरी केलीय

व्हिडिओ : लॉस एन्जेलिसमध्ये कंगनाचं 'दिवाळी सेलिब्रेशन'

नवी दिल्ली : दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक जण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) अमेरिकेत आहे. आपला आगामी सिनेमा 'थलाइवी'च्या तयारीसाठी कंगना सध्या लॉस एन्जेलिसमध्ये आहे. तिचा हा सिनेमा तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. पण, दिवाळी आहे तर सेलिब्रेशन व्हायलाच हवं... 

कामाच्या व्यापातून वेळ काढून कंगनानंही आपल्या सिनेमाच्या टीमसोबत दिवाळी साजरी केलीय. कंगनानं शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याच सेलिब्रेशनचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केलाय.

या फोटोत कंगना आपली बहिण रंगोली आणि 'थलाइवी'च्या टीमसोबत डिनर करताना दिसतेय. 'कंगनासाठी दिवाळी लवकरच आलीय... कारण ती सध्या लॉस एन्जेलिसमध्ये थलाइवीची तयारी करतेय' असं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. 

कंगनाचा हा सिनेमा तमिळमध्ये 'थलाइवी' आणि हिंदीमध्ये 'जया' या नावानं प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक ए. एल विजय हाताळत आहेत. 'बाहुबली' आणि 'मणिकर्णिका' फेम लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद या सिनेमाचंही लेखन करत आहेत. 

Read More