Marathi News> मनोरंजन
Advertisement

कंगना पुन्हा हृतिकवर भडकली, म्हणाली, '6 बोटं असणारा...'

कायम वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा चर्चेत, कारण...  

कंगना पुन्हा हृतिकवर भडकली, म्हणाली, '6 बोटं असणारा...'

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानौतमधील वाद प्रत्येकाला माहिती आहे. कंगना कायम हृतिकवर जुन्या वादावरून निशाणा साधत असते. हृतिकला बोलण्याची संधी कंगनाने  'लॉक अप' (Lock Upp) शोमध्ये देखील सोडली नाही. यावेळी कंगनाने हृतिकचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाचा  'लॉक अप' (Lock Upp)शो 27 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. 

एका रिपोर्टनुसार अनेक लोग शोमध्ये एक्सपोझ होण्यासाठी घाबरत आहेत. यावेळी कंगनाने अशी काही मतं मांडली ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. यादरम्यानची एक पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

कंगना म्हणाली, 'लोक स्वतःची बोटं जोडून... हात जोडत आहेत आणि 6 बोटं असलेल्याचा देखील गळा कोरडा झाला आहे.' यावेळी कंगनाने 6 बोटं असणारा... असा शब्द वापरला.. ज्यामुळे खळबळ माजली. 

बॉलिवूडमध्ये हृतिक रोशला 6 बोटं  आहेत. यादरम्यान, नाव न घेता कंगनाने हृतिकवर निशाणा साधला आणि म्हणाली... हृतिक रोशन शोमुळे घाबरला आहे की, त्याचं सर्व रहस्य समोर तर येणार नाही ना? याची त्याला भीती वाटत आहे...   मात्र, याआधीही कंगना रानौतने हृतिक रोशनवर अनेकदा निशाणा साधला आहे.

Read More