Marathi News> मनोरंजन
Advertisement

SSR Suicide : ...नाहीतर पद्मश्री पुरस्कार परत करेन - कंगना रानौत

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बॉलिवूडमधील घराणेशाहीचा विरोध करत आहे.   

SSR Suicide : ...नाहीतर पद्मश्री पुरस्कार परत करेन - कंगना रानौत

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात सोशल मीडियावर चांगलाच संताप वक्त होताना दिसत आहे. सुशांतची  आत्महत्या नव्हे तर हत्या आहे आणि ही हत्या बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीमुळे झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाली. घराणेशाहीवर केलेले आरोप सिद्ध करुन दाखवले नाहीत तर पद्मश्री हा पुरस्कार परत करण्याचे खळबजनक विधान केले आहे.

ती म्हणाली, 'मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं होतं. मनालीमध्ये असल्यामुळे कोणाला तरी माझा जबाब नोंद करण्यासाठी पाठवा अशी मी पोलिसांकडे  मागणी केली. परंतु आतापर्यंत  मला मुंबई पोलिसांकडून काहीच उत्तर मिळाले नाही.' रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने वक्तव्य केलं.

शिवाय, मी असं काही बोलत असेल जे मला सिद्ध करता येणार नाही, तर मी माझा पद्मश्री हा पुरस्कार तुम्हाला परत करेन’ असे कंगना म्हणाली. दरम्यान सध्या सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर वरूण धवन, आलिया भट्ट, सोनम कपूर यांसारख्या स्टारकिड्सवर टीका होत आहे. शिवाय सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झाली असून कंगना रानौत सारख्या कलाकारांच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

Read More