Marathi News> मनोरंजन
Advertisement

आपल्या अफेअर्सबद्दल बोलली कंगणा ...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने आपल्या मेहनतीच्या जोरावर करिअरच्या उंचीवर आहे. 

आपल्या अफेअर्सबद्दल बोलली कंगणा ...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने आपल्या मेहनतीच्या जोरावर करिअरच्या उंचीवर आहे. पण आपल्या वैयक्तिक गोष्टींवरुन ती कायम वादात राहते. त्याचबरोबर तिचे बेधडक स्पष्ट बोलण्याचा स्वभाव वादाला कारणीभूत ठरतो. 

अफेअर्सबद्दल मनमोकळेपणाने बोलली कंगणा

अलिकडेच एका मुलाखतीत कंगना म्हणाली की, माझ्या आयुष्यात खूप मुले आली ज्याच्याशी मला प्रेम झाले. पण अजून ड्रिम मॅन भेटला नाही. मोठ्या पडद्यावर रोमांटिक भूमिका साकारणाऱ्या कंगनाच्या खऱ्या आयुष्यात तिला प्रेमात धोकाच मिळाला.

काय बोलली ती?

कंगना न्यूज १८ च्या कार्यक्रमात आपल्या अफेअर्सबद्दल मोकळेपणाने बोलली. तिचे आतापर्यंत अनेक अफेअर्स झाले. १६-३० वर्षांपर्यंत ती अनेकदा प्रेमात पडली पण तिला प्रेमात कायम धोकाच मिळाला. या अफेअर्स पैकी एकदाही मी स्वतःहून ब्रेकअप केलेले नाही. मात्र माझ्यासोबत नेहमीच धोका झाला आहे. प्रत्येक ब्रेकअपनंतर मला माझे जग उद्धवस्त झाल्यासारखे वाटले. इतकंच नाही तर माझ्या काही बॉयफ्रेंड्सला असे वाटते की मी त्यांच्यावर काळी जादू करते. माझे प्रेम अनेकांना वेडेपणा वाटते. अशावेळी या सगळ्याकडे दुर्लक्ष करते आणि आयुष्यात मुव्ह ऑन होते. 

कंगणाचे सिनेमे

सध्या कंगणा मणिकर्णिका या सिनेमाचे शूटिंग करत आहे. त्याचबरोबर राजकूमार रावसोबत ती मेंटल है क्या च्या शूटिंगला लवकरच सुरूवात करणार आहे.  

Read More