Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

कंगणाची बहिण रंगोली चंडेलने तक्रार दाखल केली आहे.

आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्कार आणि मानसिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्री कंगनाच्या बहिणीने आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य पांचोलीला नोटीस बजावली आहे. सुमारे १३ वर्षांपूर्वीचं हे प्रकरण त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. एवढे दिवस आमच्याकडे ठोस पुरावे नव्हते, त्यामुळे आम्ही शांत होतो, असं कंगणाच्या बहिणीने म्हटलंय. आता ठोस पुराव्यांसोबत आम्ही ही लढाई नव्याने लढणार असल्याचं तिने म्हटलंय. विशेष म्हणजे याआधी आदित्य पांचोलीनेही कंगणा आणि तिची बहिण रंगोलीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 

fallbacks

कंगणाची बहिण रंगोली चंडेलने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. १३ वर्षांपूर्वी आदित्यने आपल्या बहिणीवर रंगोलीवर अपशब्द आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पांचोलीनेही त्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कंगणाच्या वकीलाने माझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिली असल्याचे सांगण्यात आलं आहे. 

Read More