Marathi News> मनोरंजन
Advertisement

लंडनमध्ये साजरा केला कंगना रणावतने योगादिन

जगभरात आज चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जात आहे. 

लंडनमध्ये साजरा केला कंगना रणावतने योगादिन

मुंबई : जगभरात आज चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जात आहे. सामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटींनीदेखील आज योगादिनाचं सेलिब्रेशन कराताना काही खास व्हिडिओ शेअर केले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फीटनेस रिजीममध्ये योगासनांचा समावेश आहे. 

सध्या लंडनमध्ये असलेल्या कंगना रणावतनेही यामध्ये सहभाग घेत खास व्हिडिओ शेअर केला आहे. लंडन पार्कमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. सध्या कंगना लंडनमध्ये 'मेंटल है क्या' चित्रपटाचे शूटिंग करत आहे.  या चित्रपटामध्ये कंगनासोबत राजकुमार राव आहे. 

 

 

'मणिकर्णिका'कडे लक्ष  

ऑगस्ट महिन्याच्या अंतिम टप्प्यात कंगणाचा 'मणिकर्णिका' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगणा राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सच्या अनुसार, कंगनाने अनुराग बासूच्या 'इमली' चित्रपट करणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग या वर्षअखेरीस सुरू होणार आहे. कंगनाने अनुराग बासूच्या 'गॅंगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. दरम्यान 'काईट्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगना आणि अनुरागमध्ये वाद झाले होते. 

Read More