Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर कपूर गर्लचा जंगी विवाह सोहळा, मुलाचा भन्नाट डान्स

घटस्फोटानंतर 10 वर्षांनी कपूर गर्लने केलं लग्न, आईच्या लग्नात मोठ्या मुलाचा भन्नाट डान्स   

घटस्फोटानंतर कपूर गर्लचा जंगी विवाह सोहळा, मुलाचा भन्नाट डान्स

मुंबई :  बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा लग्न बंधनात अडकली आहे. गुरुवारी कनिकाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये कनिका आयुष्यातील खास क्षणांचा अनुभव घेताना दिसत आहे. 

साखपुडा, लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओनंतर कनिकाच्या रिसेप्शनपार्टीचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कनिकाचा मुलागा आईच्या लग्नात भन्नाट डान्स करताना दिसत आहे.  सध्या सर्वत्र कनिका आणि तिच्या मोठ्या मुलाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कनिकाने 20 मे रोजी पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली. कनिकाने लंडनमधील एनआरआय बॉयफ्रेंड गौतम (Gautam Hathiramani) सोबत लग्न केलं आहे. मेहंदी सोहळ्या दरम्यान कनिका आणि गौतमचे काही फोटो व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघे रोमँटिक होताना दिसले. 

कनिका कपूरबद्दल सांगायचं झालं तर, तिचं हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न NRI उद्योगपती राज चंडौक यांच्याशी झाले होते. तो लंडनचा रहिवासी होता, पण राज आणि कनिकाने 2012 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कनिका कपूरला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.

Read More