Marathi News> मनोरंजन
Advertisement

कनिकाचा दुसराही रिपोर्ट पॉझिटिव्ह, परिस्थिती अद्यापही....

तिच्या नातेवाईकांकडून पुन्हा कोरोना चाचणी करण्याची मागणी करण्यात आली.  

कनिकाचा दुसराही रिपोर्ट पॉझिटिव्ह, परिस्थिती अद्यापही....

मुंबई : काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूरची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा करण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह असताना देखील तिच्या नातेवाईकांकडून पुन्हा कोरोना चाचणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्यांदा कनिकाची कोरोना चाचणी करण्यात आणि आणि तिची ही चाचणी देखील पॉझिटीव्ह सिद्ध झाली आहे. कनिकाच्या कुटुंबियांना तिच्या आलेल्या रिपोर्टवर संशय व्यक्त केला होता. 

त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती. सध्या कनिकाची परिस्थिती स्थिर असल्याचं समजत आहे. 

गायिका  kanika kapoor कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच तिच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तींची यादी तयार करत त्यांची कोरोनासाठीची चाचणी करण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली.

डीएनएने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार कनिकासोबतच तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. लंडनवरून भारतात परतल्यानंतर तिने ३५ लोकांसोबत अधिक वेळ व्यतीत केला. त्यांपैकी ११ जणांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत, तर २४ जणांचे रिपोर्ट यायचे आहेत 

Read More