Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : पत्नी गरोदर असताना प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीवर दुःखाचं डोंगर  कोसळलं  आहे.   

धक्कादायक : पत्नी गरोदर असताना प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजाने या  जगाचा अखेरचा निरोप घेतला. तो ३९ वर्षांचा होता. ७ जून रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं होतं शिवाय त्याला श्वास घेण्यास देखील अडथळे निर्माण होत होते.  त्याचा वाढता त्रास पाहाता त्याला तात्काळ बंगळूरुमधील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु  उपचारा दरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank u soo much @megsraj with u life is soo beautiful...Love u

A post shared by Chirranjeevi Sarja (@chirusarja) on

त्याच्या निधनामुळे राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. शिवाय चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून चिरंजीवीला श्रद्धांजली वाहिली आहे. परंतु त्याच्या अशा अचानक निघूण जाण्याचा मोठा फटका त्याची पत्नी अभिनेत्री मेघना राजला बसला आहे. मेघना ही गरोदर असून पतीच्या निधनाची बातमी कळताच तिच्यावर दुःखाचं डोंगर  कोसळलं  आहे. 

लग्नापूर्वी जवळपास १० वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होती. काही दिवसांनी त्यांच्या प्रेमाचे  रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  चिरंजीवी आणि मेघना राज यांनी २०१८ रोजी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाले आहेत. 

चिरंजीवीने 'वायूपात्र' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. आतापर्यंत त्याने २२ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. त्यामधील अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या  मनात घर केले आहे. 

Read More