Marathi News> मनोरंजन
Advertisement

दारुच्या नशेत अभिनेता राजा चौधरीचा धिंगाणा

बिग बॉस फेम अभिनेता राजा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेता राजा चौधरीने कानपुरमध्ये दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'संगम रिश्तों का' या भोजपुरी सिनेमाचं शूटिंग सुरु होतं त्याच दरम्यान राजा चौधरीने दारुच्या नशेत धिंगाणा घातला.

दारुच्या नशेत अभिनेता राजा चौधरीचा धिंगाणा

नवी दिल्ली : बिग बॉस फेम अभिनेता राजा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेता राजा चौधरीने कानपुरमध्ये दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'संगम रिश्तों का' या भोजपुरी सिनेमाचं शूटिंग सुरु होतं त्याच दरम्यान राजा चौधरीने दारुच्या नशेत धिंगाणा घातला.

टीव्ही अभिनेता राजा चौधरीवर आरोप आहे की त्याने शूटिंग युनिटसोबत गैरव्यवहार केला. यावेळी युनिटमधील काही सदस्यांनी त्याला विरोध करताच राजा चौधरीने कॅमेरामनसोबतच अनेकांना मारहाण केली. 

वाढता गोंधळ पाहून सिनेमाच्या निर्मात्याने पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अभिनेता राजा चौधरी याला पोलीस ठाण्यात नेलं.

शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर राजा चौधरीने पोलिसांनाही शिवीगाळ केली. यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात राजा चौधरीला पाठवलं. रुग्णालयातही त्याने डॉक्टरांसोबत गैरव्यवहार केला यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध करताच त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण करण्यास राजा चौधरीने केली.

या घटनेवेळी पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरु असून तपासानंतर आरोपी विरोधात योग्य कारवाई करण्यात येईल.

Read More