Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे एकत्र येणार ?

आजारपण आणि सहकलाकारांसोबत झालेल्या वादानंतर कॉमेडी किंग कपिल शर्मा टेलिव्हिजनपासून दूर गेला होता. आता लवकरच कपिल शर्मा एक नवा कार्यक्रम घेऊन टेलिव्हिजनवर परत येत आहे.  

कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे एकत्र येणार ?

मुंबई : आजारपण आणि सहकलाकारांसोबत झालेल्या वादानंतर कॉमेडी किंग कपिल शर्मा टेलिव्हिजनपासून दूर गेला होता. आता लवकरच कपिल शर्मा एक नवा कार्यक्रम घेऊन टेलिव्हिजनवर परत येत आहे.  

कपिल शर्मचा  नवा शो  

'फॅमिली टाईम विद कपिल शर्मा' असे कपिलच्या नव्या शोचं नाव आहे. यामध्ये कुटुंबासोबत काही खेळ खेळले जाणार आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात येणार्‍या या कॉमेडी शो बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. हा कार्यक्रम 25 मार्चपासून सुरू होणार आहे.  

सुनील ग्रोव्हर शोचा भाग नाही 

कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये सुनील ग्रोव्हर यापूर्वी एक महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र ऑस्ट्रेलियाहून परतताना सुनील ग्रोव्हर आणि कपिल यांच्यामध्ये वाद झाले आहे. हे पुन्हा एकत्र येणार का ? अशी चर्चा होती. मात्र ती शक्यता आता पुसट झाली आहे.  

सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे एकत्र येणार 

अभिनेता सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा यांचे एकत्र काही फोटो सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाले आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये वाद झाल्यानंतर अनेक कलाकारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. यामध्ये या शोची निर्माती प्रीती सिमोन यांचा समावेश आहे. 

fallbacks

शिल्पा शिंदेचा कॉमेडी सेन्स अफलातून आहे. त्यामुळे कपिल शर्माच्या शोला टक्कर देण्यासाठी नव्या शोची तयारी होत आहे अशी चर्चा रंगली आहे. 

 

 

Wassaapp ! @shilpa_shinde_official #sunilgrover

A post shared by Preeti Simoes (@preeti_simoes) on

Read More