Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्माने बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावे केली सगळी संपत्ती, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही

प्रेम व्यक्त करताना दिसला कपिल 

कपिल शर्माने बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावे केली सगळी संपत्ती, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही

मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिचा आगामी चित्रपट 'गहराइया'चे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच दीपिका अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवासोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचली.

त्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम देखील कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान कपिल शर्माने दीपिका पदुकोणसोबत खूप फ्लर्ट केले. इतकेच नाही तर दीपिका पदुकोणला खूश करण्यासाठी कपिलने आपली सर्व संपत्ती अभिनेत्रीसाठी खर्च करू शकतो असेही सांगितले.

कपिलने दीपिकासाठी गायलं गाणं

'द कपिल शर्मा शो'च्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक शकुन बत्रा 'गहराइया'च्या टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये दिसत आहेत. दीपिका पदुकोणला पाहून कपिल शर्मा खूप खूश झाल्याचे या प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

यादरम्यान त्याने दीपिकासाठी 'हमे तुमसे प्यार कितना' हे गाणे गायले. तर दुसरीकडे दीपिकानेही कपिलला गाणं गाण्यात साथ दिली. गाणे संपल्यानंतर कपिलनेही दीपिकाला मिठी मारली. आणि आपली मनातील भावना व्यक्त केली.

दीपिकाला विचारला सवाल 

कपिल शर्मानेही दीपिका पदुकोणला प्रश्न विचारला आहे. तो विचारतो की, तुम्ही सर्व प्रकारचे चित्रपट केलेत, पण तुम्हाला कॉमेडी चित्रपट करायचे असतील तर कोणाशी संपर्क साधणार? यावर कपिलने त्याच्या नावाचा इशारा देत म्हटले आहे की, आजकाल ट्विटरवर एक मुलगा ट्रेंड करत आहे.

कपिलचे बोलणे ऐकल्यानंतर दीपिका म्हणाली, 'हो, त्याचे नाव कपिल शर्मा आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छा आहे. तू माझा को-स्टार आहेस आणि चित्रपटाची निर्मितीही करू शकतोस.’ उत्तरात कपिल म्हणतो, ‘दीपिकासाठी माझी सगळी संपत्ती देऊ शकतो’ कपिलचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात.

Read More