Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kapil Sharma चा 'टिप-टिप बरसा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

कपिल शर्माचा भन्नाट डान्स  

Kapil Sharma चा 'टिप-टिप बरसा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सध्या विनोदवीर कपिल शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो 'टिप-टिप बरसा' गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. सांगायचं झालं तर कपिलच्या 'द कपिल शर्मा' शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. शोच्या आगामी भागात अभिनेत्री  रवीना टंडन आणि  फराह खान उपस्थित राहणार आहे. रविना येणार म्हटल्यावर 'टिप-टिप बरसा' हे गाणं वााजणारचं. 

रविना स्टेडवर एन्ट्री करते, तितक्यात 'टिप-टिप बरसा' गाणं सुरू होतं. गाण्यावर रविनासोबत कपिल देखील ठेका धरतो. रविनासोबत डान्स केल्यानंतर कपिल, फरहाला विचारतो, माझा डान्स तुला कसा वाटला?

कपिलच्या प्रश्नावर फरहा म्हणते, 'तुझा डान्स पाहून तर पाऊस पण बंद होईल....' फरहाच्या वक्तव्यानंतर कपिलसह उपस्थित सर्व प्रेक्षक पोट धरून हसू लागतात. सध्या कपिलचा  'टिप-टिप बरसा' सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

Read More