Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्मा आणि पत्नीचा 'तो' खास क्षण कॅमेऱ्यात कैद

कपिल शर्मा आणि पत्नीचा तो खास क्षण आणि चर्चांना उधाण...  

कपिल शर्मा आणि पत्नीचा 'तो' खास क्षण कॅमेऱ्यात कैद

मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा कायम त्याच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकाचं मनोरंजन करत असतो. त्याच्या विनोदाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. ज्यामुळे तो कायम चर्चेत असतो. पण कपिल आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथसोबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कपिल पत्नीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये कपिल पत्नीसोबत रोमाँटिक अंदाजात दिसत आहे. कपिलचा वेगळा अंदाज विरल भयानीने इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कपिल कॅमेऱ्यामॅनला पोज देताना पत्नी गिन्नीला किस करताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पत्नी गिन्नीसोबत कपिलचा हा व्हिडीओ अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'गहराइया' सिनेमातील आहे. यादरम्यान गिन्नी आणि कपिलने पापाराझींना पोज दिली. कपिलने पत्नीला कॅमेऱ्यात किस केले. कपलची ही स्टाइल लोकांना खूप आवडते.

कपिलच्या अंदाजावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करत 'कपिल आणि गिन्नी दोघे सुंदर दिसत आहेत...' असं लिहिलं आहे,तर अन्य एका युजरने, 'भाईचा मूड आज चांगला आहे, असं लिहिलं आहे...' सध्या दोघांचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. 

Read More