Marathi News> मनोरंजन
Advertisement

'द कपिल शर्मा' शो सोडून फूड रायडर बनला Kapil Sharma?

कपिल शर्माने सोडला 'शो' आता करतोय फूड रायडरचं काम? पाहा नेमकं काय 'त्या फोटो'मागचं सत्य

'द कपिल शर्मा' शो सोडून फूड रायडर बनला Kapil Sharma?

मुंबई : द कश्मीर फाईल्समुळे कपिल शर्मा शो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. कपिलचा शो दोन कलाकारांनी सोडल्यानंतर आता कपिलनेही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला का अशी एक चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो आहे. या फोटोमुळे कपिलने शो सोडला का अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रसिद्ध कॉमेडियम कपिल शर्मा रस्त्यात बाइकवर फूड रायडरच्या अवतारात दिसला. त्याला पाहून सर्वजण अवाक झाले. कुणीतरी याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मोठी खळबळ उडाली. 

हा फोटो व्हायरल होताच कपिल शर्माने 'कोणाला सांगू नका', असं कॅप्शन देऊन तो फोटो रिट्वीट केला. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. या फोटोमध्ये पाहू शकता की कपिल शर्मा बाईकवर बसला आहे. त्याच्या पाठीवर फूड डिलिव्हरीसाठी बॅग आहे. तो सिग्नल लागल्याने थांबला असताना त्याला काही लोकांनी पाहिलं. 

 आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकीत झाले. सर्वांना एकच प्रश्न पडला कपिल शर्मा तेही अशा अवतारात नक्की चाललंय तरी काय? नेहमी सगळ्यांना हसवणारा कपिल आज असा का दिसला. मात्र या फोटोमागे एक खास सिक्रेट आहे. 

नंदिता दास यांच्या सिनेमामध्ये कपिल शर्मा एक खास भूमिका करत आहे. त्यासाठी कपिलने फूड रायडरचा वेश परिधान केला होता. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. या शूटिंग दरम्यानचा हा फोटो असल्याची माहिती मिळाली आहे. कपिल शर्माने शो सोडला नाही. तशी कोणतीही अधिकृत घोषणाही त्याने केली नाही. उलट तो सध्या एक सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

काही लोकांनी कपिल शर्माला ओळखणं या फोटोमध्ये कठीण असल्याची कमेंट या फोटोवर केली आहे. तर काहींनी कपिल शर्मा शो सोडला का? दुसरा जॉब निवडला का? असे अनेक प्रश्न विचारले आहेत. तर एका युजर्सने पार्ट टाइम नोकरी करताना कपिल पाजी अशी कमेंट केली आहे. कपिलचा हा फोटो सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 

Read More