Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्माला 'ही' महिला म्हणाली, 'या गरिबाचं भलं करायला हवं'

फक्त या महिलेमुळे कपिल यशाच्या उच्च शिखरावर, ती महिला नक्की आहे तरी कोण?   

कपिल शर्माला 'ही' महिला म्हणाली, 'या गरिबाचं भलं करायला हवं'

मुंबई : सर्वांना पोट धरून हासवणारा सध्याच्या घडीचा विनोदवीर म्हणजे कपिल शर्मा... कपिल त्याच्या 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून सर्वांना हासण्यास भाग पाडतो. आता कपिलने डिजिटल विश्वात पदार्पण केलं आहे. कपिल शर्माचा 'आय एम नॉट डन यट' हा शो 28 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. शोचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये कपिलला एक महिला म्हणाली, 'या गरिबाचं भलं करायला हवं'..... ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नी गिन्नी आहे. कपिल गिन्नीला विचारतो, 'गिन्नी तू एका चांगल्या घरातली आहेस. तुझ्या घरची परिस्थिती देखील उत्तम आहे... असं असताना तू एका स्कूटरवाल्याच्या प्रेमात कशी पडलीस...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

यावर गिन्नी म्हणते, 'श्रीमंतांवर प्रत्येक जण प्रेम करतो... पण मला असं वाटलं  या गरिबाचं भलं करायला हवं...' सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कपिल आणि गिन्नी यांचं लग्न 2019 साली झालं. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

Read More