Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kapil Sharma is Back : चाहत्यांची प्रतीक्षा संपली

नवीन विनोदवीरांसह पुन्हा सुरू होणार 'द कपिल शर्मा शो'
     

Kapil Sharma is Back : चाहत्यांची प्रतीक्षा संपली

मुंबई :  विनोदवीर कपिल शर्माच्या विनोदबुद्धीने 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून सर्वांना पोट धरून हासण्यास  भाग पाडले. पण काही दिवसांसाठी कपिलचा शो ऑफ एअर गेला होता. मात्र आता एका अनोख्या आणि हटके पद्धतीत प्रेक्षकांना हासवण्यासाठी तयार झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या शोमध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नवीन विनोदवीर कोण आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पूर्वीच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरन सिंह प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. मात्र आता शोमध्ये आणखी कलांकारांची भर्ती होणार असल्याची शक्यता आहे. कपिल शोमध्ये नवे कलाकार आणि लेखकांना घेणार आहे. 

मी कपिल  शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांचं स्वागत करण्यासाठी उत्सूक आणि आनंदी आहे. प्रेक्षकांचं मनोरंजना करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या कलाकारांना भेटण्यासाठी मी फार उत्सुक असल्याचं देखील कपिलने सांगितलं. कपिल शर्मा शोचं प्रॉडक्शन सलमान खान टेलीव्हीजन आणि Banijay Asia द्वारा करण्यात येणार आहे. 

Read More