Marathi News> मनोरंजन
Advertisement

वाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!

अलिकडेच बॉलिवूडच्या चांदणीचे निधन झाले. जान्हवी आणि खूशी या त्यांच्या मुली आईच्या मायेला पारख्या झाल्या.

वाढदिवसाला कपूर सिस्टरचे जान्हवीला खास सरप्राईज!

नवी दिल्ली : अलिकडेच बॉलिवूडच्या चांदणीचे निधन झाले. जान्हवी आणि खूशी या त्यांच्या मुली आईच्या मायेला पारख्या झाल्या. त्याचबरोबर त्यांनी एक चांगली मैत्रिणही गमावली. यातच ६ मार्चला जान्हवीचा २१ वा वाढदिवस होता. मात्र तिला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी कपूर परिवाराने तिला खास सरप्राईज दिले.

बहिणींनी दिले सरप्राईज

यात विशेष करून बोनी कपूरची पहिली पत्नीची मुलगी अंशुला देखील सहभागी झाली होती. त्याचबरोबर सोनम कपूर, रिया कपूर आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर देखील सहभागी झाले होते. यावेळी जान्हवीने बोनी कपूर यांच्यासह केक कापला.

fallbacks

 

#kapooranddaughters  @sanjaykapoor2500

A post shared by sonamkapoor (@sonamkapoor) on

धडकमधून पर्दापण

जान्हवी लवकरच धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. यात ती शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत झळकणार आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या तिने श्रीदेवींच्या जाण्यानंतर काही वेळासाठी शूटिंग थांबवले आहे. 

 

Read More