Marathi News> मनोरंजन
Advertisement

लिपलॉक सिनमुळे 'या' सेलेब्रिटी किडचा पहिलाच चित्रपट चर्चेत

'पल पल दिल के पास' चित्रपट २० सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

लिपलॉक सिनमुळे 'या' सेलेब्रिटी किडचा पहिलाच चित्रपट चर्चेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये देओल कुटुंबाची तिसरी पिढी आहे. अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलचा पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काहीदिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर चित्रपटातील पहिलं गाणं सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटातील 'पल पल दिल के पास' रोमॅन्टीक गाणं यूट्यूबवर ट्रेंड होत आहे. 'पपल पल दिल के पास' चित्रपटातील पहिल ट्रॅक सॉन्ग करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलं आहे.  

या गाण्यातील करण देओल आणि सहर बाम्बा यांच्यामधील केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. झी म्यूझीक कपंनीने साकारलेल्या 'पल पल दिल के पास' गाण्याला गायक अरिजीत सिंहने आवाज दिला आहे. 

त्याचप्रमाणे चित्रपटातील लिपलॉक सिनमुळे करण चित्रपटाच्या प्रदर्शना पूर्वीच प्रकाशझोतात आला आहे. 'पल पल दिल के पास' चित्रपट २० सप्टेंबरला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Read More