Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia Bhatt Daughter : रक्ताचं नातं नसूनही आलियाला वडिलांची माया देणाऱ्या खास व्यक्तीची Emotional Post

आलियानं काल 7 नोव्हेंबर रोजी तिच्या मुलीला जन्म दिला आहे. 

Alia Bhatt Daughter : रक्ताचं नातं नसूनही आलियाला वडिलांची माया देणाऱ्या खास व्यक्तीची Emotional Post

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) आपल्या मुलीप्रमाणे मानतो. आलिया आणि रणबीरचं (Ranbir Kapoor) लग्न झालं त्यावेळी देखील तो भावूक झाला होता. त्यानंतर आलियानं तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली तेव्हा करणला खूप आनंद झाला. एकीकडे संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटूंब आलिया आणि रणबीरच्या बाळाची प्रतिक्षा करत होते तिथे करण देखील आलियाच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक होता. दरम्यान, आलियानं काल सहा नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर करण जोहरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे. (Alia Bhatt Daughter) 

हेही वाचा : थरारक! 'या' चित्रपटाच्या स्क्रिप्टला मिळाला होता शाप, जो अभिनेता वाचायचा त्याचा व्हायचा मृत्यु

करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये करणनं आलिया आणि रणबीरच्या लग्नातील (Alia and Ranbir's Wedding) एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 'मला खूप आनंद झाला आहे... या जगात तुझं खूप खूप स्वागत आहे... तुझ्यावर प्रेम करण्यासाठी अनेक लोक प्रतिक्षा करत होते... आय लव्ह यू आलिया आणि रणबीर... आणि मी आजोबा झालो', असे कॅप्शन करणनं दिलं आहे. यासोबत करणनं हार्ट इमोटिकॉन वापरले आहेत. करणची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी आलियासोबत पती आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) देखील होता. मुलीच्या जन्मानंतर आलियानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत आलियानं त्यांना कन्या रत्न झाल्याचे सांगितले. (karan johar calls himself proud nana as alia bhatt and ranbir kapoor blessed with baby girl) 

काय आहे आलियाच्या मुलीचं नाव

आलियाने स्वतःच्या आणि पती रणबीरच्या नावावरुन बाळाचं नाव ठरवलं होतं. आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं प्रमोशन करत होती. तेव्हा आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला. मुलाखती दरम्यान आलियाला विचारलं, 'तिचं नाव आलिया ऐवजी दुसरं असतं, तिने कोणत्या नावाची निवड केली असती.' तेव्हा आलियाने आवडत्या नावाबद्दल सांगितलं. 

आलिया भट्टने तिचं आवडतं नाव आयरा सांगितलं. आयरा नावाचं वैशिष्ट्य म्हणजे आलियाच्या नावाचं पहिलं अक्षर सुरुवातीला 'आ' असून   रणबीरच्या नावाचं पहिलं अक्षर शेवटी 'र' आहे. त्यामुळे आलिया आपल्या मुलीचे नाव आयरा ठेवू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

कशी आहे आलिया भट्टची 

नातीच्या जन्मानंतर नीतू सिंग (Neetu Singh) लगेच रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्यानंतर नीतू यांना पापाराझींनी आलिया आणि तिच्या मुलीच्या प्रकृतीविषयी विचारले. त्या दोघी सुखरुप असल्याचे नीतू यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी पापाराझींनी नीतू यांना मुलगी ही आलियासारखी दिसते की रणबीरसारखी? त्यावर उत्तर देत नीतू म्हणाल्या की ती अजून खूपच लहान आहे.  

Read More