Marathi News> मनोरंजन
Advertisement

फोटोज : करण जोहरच्या 'कॉलिंग करण' शो च्या नव्या सीजनचे लॉन्चिंग

 बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमी विविध पैलूंवर काम करत असतो. 

फोटोज : करण जोहरच्या 'कॉलिंग करण' शो च्या नव्या सीजनचे लॉन्चिंग

मुंबई : बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर नेहमी विविध पैलूंवर काम करत असतो. सतत नवनवे प्रयोग करुन पाहायला त्याला खूप आवडते. सिनेमांच्या निर्मिती-दिग्दर्शनापासून ते शोज होस्टींगपर्यंत सर्व काही तो करत असतो. टीव्ही वरील करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण' हा चांगलाच लोकप्रिय आहे. यानंतर करणने आता रेडिओवरही टॉक शोची सुरुवात केली आहे. तो 'कॉलिंग करण'चा दुसरा सिजन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण करणचा हा शो पूर्वीपेक्षा अधिक बोल्ड असणार आहे.

मुंबईत या शो चे लॉन्जिंग पार पडले. यात करण जोहरने सांगितले की, चांगल्या अभिनेत्याजवळ दर्द दिल असणे गरजेचे आहे. कारण त्याचमुळे तो आपली कला पडद्यावर अधिक सुंदरतेने वठवू शकतो.

fallbacks

करणचा हा रेडिओ शो इश्क 104.8 एफएम वर प्रसारित होईल. या शो लॉन्जिंगला अभिनेत्री नेहा धूपिया, दिग्दर्शक इम्तियाज अली आणि अभिनेता रणविजय सिंग देखील करणसोबत मंचावर उपस्थित होते.

fallbacks

यावेळेस करण म्हणाला की, मला असे वाटते की, ज्यांचा प्रेमभंग झाला नाही ते त्याप्रकारे अभिनय करु शकणार नाहीत ज्याप्रकारे त्यांना करायला हवा. जर तुम्ही चांगले अभिनेते असाल तर नक्कीच तुमचा प्रेमभंग झाला असेल. त्याशिवाय कॅमेऱ्यासमोर खास भावना घेऊन अभिनय करणे शक्य होणार नाही.

fallbacks

पुढे तो म्हणाला की, कधी कधी डोळे तुमच्या हृदयातील दर्द व्यक्त करतात. अनेकांच्या डोळ्यातून या भावना स्पष्ट दिसतात. कारण त्यांनी आयुष्यातील तो दुःखद प्रवास पार केलेला असतो. 

fallbacks

'रोडीज एक्‍स' मध्ये झळकलेला अभिनेता रणविजयचा खास लूक.

fallbacks

दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा बालाजी मोशन फिल्‍म्‍ससोबत लैला मजून हा सिनेमा लवकरच येणार आहे. 

fallbacks

Read More