Marathi News> मनोरंजन
Advertisement

"राखी सावंत आजही तितकीच..." करन जोहर असं काय म्हणाला?, वाचा

त्यात आता सर्वाधिक चर्चा आहे ती राखी सावंतची

मुंबईः सध्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटी हे पॉप्यूलर होत असतात. त्यात आता सर्वाधिक चर्चा आहे ती राखी सावंतची. तूटलेल्या लग्नांपासून ते नव्या बॉयफ्रेंडपर्यंत फक्त राखीची चर्चा आहे. त्यातून बिग बॉस क्वीन म्हणून राखीची ख्याती तर सर्वदूर आहे. 

निर्माता दिग्दर्शक करन जोहरचा बहुचर्चित शो 'कॉफी विथ करन' त्याच्या नवीन सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. त्यात आता त्याच्या नव्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर येणार आहेत. या सीझनमध्ये करनचे पहिले पाहुणे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट होते. दोन्ही स्टार्सनी शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. त्याच वेळी, शोचा होस्ट करन जोहर देखील अनेक मनोरंजक किस्से शेअर करताना दिसला. शोच्या नुकत्याच शेअर केलेल्या क्लिपमध्ये करन जोहर राखी सावंतबद्दल बोलताना दिसत आहे. करन अक्षरक्षः राखीचा फोटो हातात घेऊन तिच्याबद्दल बोलताना दिसत आहे. 

करनने राखीबद्दल जे काही सांगितले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 'कॉफी विथ करन' सीझन 7 ची एक झलक इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसली आहे, ज्यामध्ये करण राखी सावंतवर बोलत आहे. राखी सावंतचा जुना फोटो दाखवत करण म्हणतो, ''एक काळ असा होता जेव्हा सगळे राखी सावंतबद्दल बोलत होते, ती प्रामाणिक आहे आणि तीच एकमेव प्रामाणिक सेलिब्रिटी या इंडस्ट्रीत आहे. मीही आज तेच सांगेन की ती फार चांगली आणि हॉट सेलिब्रेटी आहे. आणि आजही ती तितकीच प्रामाणिक सेलिब्रेटी आहे.''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करन पुढे म्हणाला की, 'मला तिची एक ओळ नेहमी आठवते, तो म्हणाला 'जो देव देत नाही तो डॉक्टर देतो'. मला वाटतं त्यानंतर सगळ्यांनी राखी सावंतला खूप गांभीर्याने घेतलं आणि प्रत्येकजण आपापल्या शेजारच्या डॉक्टरांकडे गेला. राखी सावंत काही वर्षांपूर्वी 'कॉफी विथ करन' या शोमध्ये आली होती. त्यावेळीही करनने राखीच्या कूल स्टाइलचे आणि मोकळेपणाने बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक केले होते.  

Read More