Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्टिफिशिअल Sex मुळे सेलिब्रिटी खजील; 50. व्या वाढदिवशी आली वेगळीच माहिती समोर

झगमगाटाच्या या दुनियेशी एकरुप होऊन जगणारी ही सर्व मंडळी प्रत्यक्षात मात्र वेळीच असतात

आर्टिफिशिअल Sex मुळे सेलिब्रिटी खजील; 50. व्या वाढदिवशी आली वेगळीच माहिती समोर

मुंबई : बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांच्या मनात कायमत कुतूहल पाहायला मिळतं. झगमगाटाच्या या दुनियेशी एकरुप होऊन जगणारी ही सर्व मंडळी प्रत्यक्षात मात्र वेळीच असतात. पण, बऱ्याचदा असं होतं की हीच मंडळी निर्धास्तपणे जगण्याचा मंत्रही देऊन जातात. 

स्वत:साठी आणि स्वत:ला अगदीच हवं तसं जगणं, हेच काय ते त्यांच्या डोक्यात असतं. My Life My Rules या मंत्राच्याच अनुषंगानं जगणाऱ्या एका कलाकारानं वयाची पन्नाशी गाठली, त्याचा प्रवास आणि त्याचे चित्रपट कायमच सर्वांची मनं जिंकणारे. (karan johars 50 th birthday )

असा हा कलाकार म्हणजे, निर्माता- दिग्दर्शक आणि कधी एकेकाळचा अभिनेता करण जोहर. करण आणि त्याचं खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय. बरं, त्यानंही कधीच आपल्याबद्दलच्या गोष्ची दडवून ठेवल्या नाहीत. (Bollywood karan johar)

असं असलं तरीही त्यानं जेव्हा खुलासा केला तेव्हा मात्र चाहत्यांना धक्काच बसला. ‘An Unsuitable Boy’ या पुस्तकातही करणनं अशाच काही गोष्टींचा उलगडा केला जो वाचकांसाठी धक्का ठरला. 

वयाच्या 26 व्या वर्षी आपण स्वत:ची व्हर्जिनिटी गमावल्याचं त्यानं या पुस्तकात लिहिलं होतं. इतकंच नव्हे, तर धक्का पुढे होता. कारण, पहिल्यांदाच शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याला पैसेही मोजावे लागले होते. पहिल्यांदाच शरीरसंबंध ठेवताना आपल्या माथी अनुभवाअभावी निराशाच आल्याचं त्यानं पुस्तकात लिहिलं होतं. 

'मी तेव्हा काहीसा खजीलपणेच बाहेर पडलो. आनंद नाही मिळाला असं नाही, पण काहीतरी विचित्र वाटत होतं. ते सर्व कृत्रिम वाटत होतं. कारण, तुम्हाला आनंद देणारी व्यक्तीच कृत्रिमरित्या आनंद देत होती...', असं त्यानं पुस्तकात  म्हटलं होतं. 

fallbacks

आपल्या पहिल्यावहिल्या शरीरसंबंधांविषयी इतक्या खुलेपणानं बोलताच करणवर सर्वांच्या नजरा खिळल्या. काहींनी याकडे सकारात्मकरित्या पाहिलं. पण, काहींनी मात्र त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. 

Read More