Marathi News> मनोरंजन
Advertisement

करण-निशाचा वाद विकोपाला, मुलाच्या कस्टडीवरून निशाचं मोठ वक्तव्य

करण मेहरा आणि निशा रावल यांच नाता पहिल्यासारखंच काही राहिलेलं नाही

करण-निशाचा वाद विकोपाला, मुलाच्या कस्टडीवरून निशाचं मोठ वक्तव्य

मुंबई : करण मेहरा आणि निशा रावल यांच्यात आता पहिल्यासारखंच काही राहिलेलं नाही. हे नातं आता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. या दोघांनी आपापलं सत्य सगळ्यांसमोर मांडण्याचा विचार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून करण आणि निशा या दोघांच्या नात्याबद्दल अफवा समोर येत होत्या. करणने सुटल्यानंतर निशाविरोधात अनेक गोष्टी समोर आलं आहे. 

करणच्या बायपोलारच्या आरोपांवर निशा म्हणते की, करणने जे म्हटलंय ते आपल्या बचावासाठी आहे. माझ्यासाठी हे शॉकिंग नाही. मी माझं स्वतःचं डोकं का फोडेन. मी एक अभिनेत्री आहे. माझं माझ्या चेहऱ्यावर प्रेम आहे. मला एक मुलं आहे. मी का रिस्क घेईन. मला बाइपोलरिटीचा त्रास आहे मात्र मी वेडी नाही. 

सप्टेंबर 2014 मध्ये मी पाच महिन्यांची प्रेग्नेंट होती. मी माझं मुलं गमावलं आहे. या दरम्यान माझ्या नवऱ्याने मला मारहाण केली. तेव्हा मी डॉक्टरांना भेटले. मेंटल हेल्थबाबत जागृकता अत्यंत महत्वाची आहे. करणमुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्याचं प्रत्येक वाक्य मला दुःखी करत असे. मी कोणतीच औषध अजून खालेल्ल नाही. शेवटचं औषध मी एंग्जायटीचं घेतलं आहे. करण खूप कंट्रोलिंग आहे. मला जर डॉक्टर, जिम किंवा कुणाला भेटायचं असेल तर करण मला रोखत असे.

मी मुलाची कस्टडी घेणार 

मुलाची जबाबदारी मी घेणार. मला नाही वाटत की करण मुलाच्या कस्टडीमध्ये रस घेईल. मी त्याला विचारलं की, जर काविशची कस्टडी तुला मिळाली तर काय करशील. त्याने क्षणाचाही विलंब न करता म्हणाला की, मी शुटिंगमध्ये व्यस्त असतो. मी मुलाला दिल्लीत सोडेन. आमची काविशच्या कस्टडीवरून काहीच वाद झाला नाही. 

Read More