Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर अभिनेत्याची वाईट अवस्था, मुलगा ठरला कारण

त्यामुळे मी या सर्व गोष्टींवर बोलू शकत नाही. 

 घटस्फोटानंतर अभिनेत्याची वाईट अवस्था, मुलगा ठरला कारण

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा त्याची पत्नी निशा रावलसोबतच्या वादांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. निशाने पतीवर मारहाण आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता करण मेहराने मुलगा कविशपासून दूर राहण्याबद्दल खुलेपणाने सांगितले. जेव्हा करणला विचारण्यात आले की गेल्या नऊ महिन्यांपासून मुलापासून दूर राहणे त्याच्यासाठी किती कठीण आहे, यावर करणने सांगितले की, हा खूप कठीण क्षण आहे.

करण पुढे म्हणाला की तो एकावेळी एकच पाऊल उचलत आहे. अशा परिस्थितीत, निशाने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर लावलेल्या खोट्या आरोपांमुळे मुलापासून दूर राहणे खूप कठीण आहे.

पण सध्या मला माझ्या पालकांसोबत राहणे गरजेचं आहे. त्यानंतर माझ्या मुलासोबत राहण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या मी करेन.करणची एक्स वाईफ निशा रावल सध्या लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये आहे.

या शोमध्ये तिने पती करण मेहराचे विवाहबाह्य संबंध आणि मुलगा कविश करणच्या जवळ नसल्याचा खुलासाही केला होता.

करण मेहराला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी नवनवीन खोट्या कथा तयार केल्या जात आहेत.

fallbacks

ज्यावर मी भाष्य करू शकत नाही आणि हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे मी या सर्व गोष्टींवर बोलू शकत नाही. 

Read More