Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासे

Kareena Kapoor and Saif Ali Khan : करीना कपूर खान आणि सैफ अली खानविषयी तैमूरच्या नॅनीचा खुलासा  

'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासे

Kareena Kapoor and Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची मुलं तैमूर आणि जेह हे देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तैमूरची आया ललिता डीसिल्वानं सैफ अली खान आणि करीना कपूरची खूप स्तुती केली आहे. त्याविषयी बोलताना ललितानं खुलासा केला की करीना आणि सैफच्या घरात स्टाफ आणि घरच्यांसाठी एक जेवण बनवण्यात येत होतं. स्टाफसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येत नव्हता. त्यांनी हे देखील सांगितलं की तिला किती पगार होता. 

ललिता यांनी यूट्यूब चॅनल 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत करीना आणि सैफच्या विषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की ते सगळे नेहमीच एकत्र जेवायचे. याआधी करीनानं देखील एका मुलाखतीत करीना कपूरनं या गोष्टीवर जोर दिला की मुलांची नॅनी देखील त्यांच्यासोबत बसून जेवण करते. तिनं सांगितलं की सैफ अली खान दोन्ही वेळी डायनिंग टेबलवर नॅनीला बसायला सांगतो जेवायला. कारण तैमूर आणि जेहनं असं का करत नाही असा प्रश्न केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सैफ अली खान स्वत: खूप चांगले कूक आहेत. तो नेहमीच पतौडी कुटुंबासाठी ट्रिप्सवर सगळ्यांसाठी जेवण बनवतो. त्यांनी सांगितलं की सैफ शाकाहारी आहे तरी देखील तो खूप चांगलं लाल मीट बनवतो. स्पेगेटी, पास्ता आणि अनेक इटलीच्या डिश तो चांगल्या प्रकारे बनवतो. 

ललिता डिसिल्वानं सांगितलं की त्यांना दर-महिन्याला 2.5 लाख रुपये पगार दिला होता आणि अशी अफवाह होती की हे सत्य नाही आहे. या अफवाह सुरु होण्यावर करीना कपूरसाठी यावर हसण्याविषयी देखील सांगितलं. ज्यावर करीनानं उत्तर दिलं की ही सगळी एक मस्करी होती आणि त्याला गंभीरतेनं घेऊ नये.

हेही वाचा : 'मी होमोसेक्शुअ‍ॅलिटीच्या विरोधात नाही, पण...'; Paris Olympics वर कंगनाचा आक्षेप! 

दरम्यान, सोशल मीडियावर या सगळ्यावर खूप चर्चा सुरु होती. मात्र,सत्यात काही तथ्य नाही हे आता ललिता यांनी दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे. 

Read More