Marathi News> मनोरंजन
Advertisement

करीनाच्या घरी 'या' दिवशी येणार नवा पाहुणा; वडिलांनी दिली माहिती

करीना लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.   

करीनाच्या घरी 'या' दिवशी येणार नवा पाहुणा; वडिलांनी दिली माहिती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे खान आणि कपूर कुटुंब त्यांच्या घरातील नव्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहेत. करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानने करीना फेब्रुवारीमध्ये बाळाला जन्म देणार आहे, असं सांगितलं होतं. मात्र आता करीनाचे वडील  रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी करीना कोणत्या दिवशी बाळाला जन्म देणार याची माहिती दिली आहे. 

पुढच्या आठवड्यात करीनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, करीना 15 फेब्रुवारीला तिच्या आणि सैफच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे करीना आणि सैफचे चाहते त्यांच्या दुसऱ्या बाळाची वाट बघत आहेत. 

दरम्यान करीना सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. ती नेहमी तिच्या आरोग्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत होती. शिवाय तिने काम देखील चालूचं ठेवलं होतं. त्याचप्रमाणे ती सतत फोटो देखील शेअर करत असते. 

सैफची प्रतिक्रिया
माझ्यासाठी हे नवं नाही. पण मी फार उत्साहीत आहे. आम्ही आमच्या घारात नव्या पाहुण्याचं आगमन करण्याच्या तयारीत आहोत. या भावना मी शब्दात मांडू शकत नाही. अशी प्रतिक्रिया सैफने दिली होती. 

Read More