Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्का-विराटच्या वाटेवर सैफ-करीना, कुटुंबासाठी उचललं हे मोठं पाऊल

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनीही आपल्या कुटुंबासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

अनुष्का-विराटच्या वाटेवर सैफ-करीना, कुटुंबासाठी उचललं हे मोठं पाऊल

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणेच करीना कपूर आणि सैफ अली खान यांनीही आपल्या कुटुंबासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. पापाराझींनी त्यांच्या मुलांचे फोटो क्लिक करु नयेत असं सैफ आणि करीनालाही वाटत. याचबरोबर पापाराझींनी त्यांच्या मुलांपासून दूर राहावं यासाठी या कपलने आपल्या बॉडीगार्ड्सना ही जबाबदारी दिली आहे. नुकतंच असंच काहीसं पाहायला मिळालं. जेव्हा सैफ अली खान आणि करीना कपूर त्यांची दोन मुले तैमूर-जेसह मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉडीगार्डने फोटो काढू दिले नाहीत
व्हिडिओमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरचा धाकटा मुलगा नॅनीच्या कडेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सैफ तैमूर अली खानसोबत गप्पा मारत फिरत आहे. यादरम्यान फोटोग्राफर्सनी जेहचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बॉडीगार्डने त्यांना थांबवलं आणि नॅनीला त्याच्या मागे उभं केलं, जेणेकरून पापाराझी जेहचे फोटो क्लिक करू शकत नाहीत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली देखील त्यांची मुलगी वामिकाला पापाराझीपासून दूर ठेवतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पतौडी पॅलेसवरुन सैफ-करीना मुंबईत परतले
सैफ आणि करीना आपल्या मुलांसोबत पतौडी पॅलेसला गेले होते आणि नुकतेच मुंबईला परतले आहेत. यादरम्यान ते मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. सैफ अली खान एअरपोर्टवर हलका निळा शर्ट आणि पांढरी पँट परिधान केलेला दिसला. त्याने हातात एक पुस्तक घेतलं. त्याचवेळी करीना केशरी रंगाचा ट्रॅकसूट परिधान करताना दिसली. तैमूर अली खानने ग्रे स्वेटशर्ट आणि काळी पँट परिधान केली होती.

Read More