Marathi News> मनोरंजन
Advertisement

One Night Stand च्या करिनाच्या प्रश्नावर साराचं अनोखं उत्तर

'लव आज कल' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

One Night Stand च्या करिनाच्या प्रश्नावर साराचं अनोखं उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या स्पष्ट स्वभावामुळे ओळखली जाते. ती अनेकदा खूप मोकळेपणाने व्यक्त होते. हल्लीच सारा अभिनेत्री करिना कपूरच्या रेडिओ शो 'वॉट वीमेन वॉन्ट' मध्ये गेली होती. या कार्यक्रमात तिला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. यामध्ये करिनाने सारासोबत तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दल देखील चर्चा केली आहे. 

करिनाने साराला विचारलं की,'तू कधी वन नाइट स्टँडचा विचार केला आहे.' यावर क्षणाचाही विलंब न करताना साराने उत्तर दिलं. सारा म्हणाली की,'मी असा अजिबातच विचार करू शकत नाही.' साराचं हे उत्तर ऐकून करिनाच्या चेहऱ्यावरील तणाव दूर झाला.

आपल्याला माहितच आहे करिना ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. सैफला पहिली पत्नी अमृता सिंहपासून दोन मुलं आहेत. सारा आणि इब्राहिम. असं असलं तरीही आजही सारा आणि इब्राहिम सैफसोबत राहतात. करिना आणि या मुलांच नातं सावत्र आईचं असलं तरीही अनेकदा सारा आणि करिना चांगल्या मैत्रिणींसारख्या राहिल्या आहेत.

 सारा अली खानने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'केदारनाथ' सिनेमातून तिने कलाविश्वात पाऊल ठेवलं. लवकरच साराचा 'लव आज कल' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सारा अली खान कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा हे दोघं एकत्र दिसतात. पण अद्याप या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधलेला नाही. 

Read More