Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kareena Kapoor चा फिटनेस मंत्र; जाणून घ्या करीनाचं संपुर्ण डाएट प्लॅन

करीना कपूर खान बॉलीवूडमधील सर्वात फिट सेलिब्रिटींपैकी एक आहे. 

Kareena Kapoor चा फिटनेस मंत्र;  जाणून घ्या करीनाचं संपुर्ण डाएट प्लॅन

मुंबई : करीना कपूर खान बॉलीवूडमधील सर्वात फिट सेलिब्रिटींपैकी एक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, करीना कोणताही कठोर डाएट प्लॅन फॉलो करत नाही. मनाला वाटेल ते ते खाते. पण तिच्या चांगल्या आरोग्यासाठी ती निरोगी अन्न खाते. करीना कपूर खान 41 वर्षांची झाली असून ती दोन मुलांची आई देखील आहे. पण तरीही तिच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. जर तुम्हालाही तिच्यासारखी ग्रेट फिगर हवी असेल तर बेबोची डाएट रुटीन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं.

बेबोच्या फिटनेसचं रहस्य 
करीना कपूर खान एक फिटनेस फ्रीक आहे. ती तिच्या दैनंदिन रुटीनमध्ये योगा, मेडिटेशन आणि जिमपासून ते निरोगी खाण्यापर्यंतचा समावेश करते. या अभिनेत्रीने तिच्या दोन्ही गरोदरपणात खूप वजन वाढवलं ​​होतं. मात्र, तिने लाखो चाहत्यांना तिचं गर्भधारणेचं वजन लवकर कमी करून फिट राहण्यास प्रेरित केलं.

त्याचबरोबर, रुजुता दिवेकर ही एक सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आहे. तिने तिच्या 'एटिंग इन द एज ऑफ डायटिंग' या ऑडिओबुकमध्ये करीना कपूर खानच्या खाण्याच्या सवयींबद्दल सांगितलं. रुजुता म्हणाली की करीना सहसा तिच्या दिवसाची सुरुवात पॉवर ब्रेकफास्ट जेवणाने करते ज्यामध्ये मूठभर भिजवलेले बदाम देखील असतात. यानंतर अभिनेत्री तिच्या वर्कआउटसाठी जाते.

करीना लंच आणि डिनरमध्ये हे खाते 
दुपारच्या जेवणात, करीना कपूर खान साधं घरगुती अन्न खाते ज्यात हंगामी भाज्या, पनीर करी, दही भात आणि मसूर आणि रोटी यांचा समावेश असतो. करीनाच्या दुपारच्या जेवणाच्या वेळापत्रकाबद्दल बोलताना रुजुता दिवेकर म्हणाली की, ती दुपारच्या जेवणासाठी काळं मीठ, साखर, केशर आणि थोडेसं आलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रात्रीच्या जेवणात करीना साधारणपणे डाळ-भात-तूप किंवा खिचडी-दही किंवा दुधीची भाजी आणि ज्वारीची रोटी तुपासह खाते. करीना रात्रीचं जेवण लवकर करते. अभिनेत्रीला मिड-डे मीलमध्ये फळं किंवा नट्स खायला आवडतात.

Read More