Marathi News> मनोरंजन
Advertisement

Taimur साठी करिनाने शेअर केली इमोशनल पोस्ट

तैमूरवर त्याच्या अम्माचं सर्वाधिक प्रेम 

Taimur साठी करिनाने शेअर केली इमोशनल पोस्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने रविवारी तैमूरचा चौथा वाढदिवस साजरा केला. यावेळी करिनाने अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. करिनाने म्हटलंय की,'तैमूरला त्याच्या अम्मापेक्षा कुणीच जास्त प्रेम करत नाही.' 

करिनाने रविवारी तैमूरचा फोटो इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यासोबतच एक कोलाज देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तैमूर अनेक ऍक्टिविटी करताना दिसत आहे. या सोबतच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'माझ्या मुला ... तू चार वर्षांच्या माझ्या मुला तुझा दृढनिश्चय, समर्पण पाहून मी खूप आनंदी आहे..' अशी भावनिक पोस्ट करिनाने लिहिली आहे. 

 करिना कपूर खानने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत २०१२ साली लग्न केलं. सैफचं हे दुसरं लग्न. या जोडीला त्यांचे चाहते 'सैफीना' म्हणून संबोधतात. करिनाने २०१६ साली पहिलं मुलं तैमूरला जन्म दिला. आता करिना दुसऱ्या मुलाच्या स्वागतासाठी तयार झाली आहे. अनेकदा करिना बेबी बंप दाखवताना दिसली आहे.

Read More