मुंबई : सध्या सर्व जगाला कोरोना व्हायरसने हैरान केलं आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पोलीस, डॉक्टर युद्ध पातळीवर काम करत आहेत. कोरोना काळात लोकांना जागृत करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटींच्या नावावरून मिम्स तयार केले आहेत. आनंद (Dev Anand), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), गोविंदा (Govinda), अभिषेक बच्चन (Abhishek Bachan), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा यामध्ये समावेश आहे.
अभिनेत्री करीना कपूर खानला पोलिसांनी तयार केलेला मीम इतका आवडला, तिने मीम तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या मीममध्ये अभिनेता सैफ अली खानचा देखील उल्लेख आहे. मीममध्ये म्हटलं आहे की, 'अगर तुम मास्क नीचे 'करीना' तो बहुत 'Un-Saif' सिचुएशन हो सकता है.'
''Picture abhi baaki hai mere dost"
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 23, 2021
Thank You Mumbaikars for writing such a Bollygood script of this superhit sequel.#BeBollyGood #TakingOnCorona pic.twitter.com/yUlmSZ0TOL
सांगायचं झालं तर कोरोनामुळे सर्वात गंभीर परिस्थिती मुंबईची आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा फार भयंकर आहे. दुसऱ्या लाटेचा परिणाम बॉलिवूड विश्वावर देखील मोठ्या प्रमाणात झाला. कोरोनामुळे सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला.