Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kareena Kapoor Khan च्या किचनमध्ये घुसला Karan Johar... पण त्याने जे काही पाहिलं

अर्जुन कपूर स्वयंपाक बनवण्याबद्दल त्रासलेल्या अस्वस्थेत दिसत आहेत. दरम्यान, करण जोहर व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो  की, “आता कळालं की, ज्याचं जे काम असतं, तेचत्याने केलं पाहिजे.” 

Kareena Kapoor Khan च्या  किचनमध्ये घुसला Karan Johar... पण त्याने जे काही पाहिलं

मुंबई : बॉलिवूड कलाकार करीना कपूर, करण जोहर, मलायका अरोरा, प्रतीक गांधी  आणि अर्जुन कपूर एका नव्या शोमध्ये लवकरच दिसणार आहेत. या सर्व स्टार्सनी त्यांच्या नवीन शोबद्दल एक व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काय हे स्टार्स स्वयंपाकघरातील सगळे टास्क पूर्ण करु शकतील? हा व्हीडिओ पाहून असं वाटतय की, या सगळ्यांची प्रकृती स्वयंपाकघरात खराब होत आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या आगामी शोचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

नुकताच करीना कपूर खानने तिच्या इन्स्टाग्रामवर या शोचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर खान पिझ्झा बनवताना दिसत आहे. तर दुसरीकडे करण जोहर, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर स्वयंपाक बनवण्याबद्दल त्रासलेल्या अस्वस्थेत दिसत आहेत. दरम्यान, करण जोहर व्हिडिओमध्ये असं म्हणताना दिसत आहे की, “आता कळालं की, ज्याचं जे काम असतं, तेचत्याने केलं पाहिजे.” 

करिना कपूर खान तिच्या या शोबद्दल खूप खुश आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 7 तासात 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. करीना कपूर खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व स्टार्स किती घाबरले आहेत हे या व्हिडीओमधून पाहयला मिळत आहे.

Read More