Marathi News> मनोरंजन
Advertisement

'लग्न, घटस्फोट आणि प्रसुती...'; करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केली भावूक पोस्ट

Kareena Kapoor Cryptic Post : करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

'लग्न, घटस्फोट आणि प्रसुती...'; करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केली भावूक पोस्ट

Kareena Kapoor Cryptic Post : बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं केलेली ही पोस्ट सैफच्या हल्ल्यावर किंवा त्या संबंधीत कोणत्या विषयावर नाही तर तिनं एका वेगळ्याच विषयावर आहे. त्यात करीनानं लग्न आणि घटस्फोट सारख्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. करीनाच्या या पोस्टनंतर नेमकं काय झाल आहे असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. 

करीना कपूरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की 'तुम्ही लग्न, घटस्फोट, चिंता, प्रसुती, आपल्या जवळच्याच निधन, पालकत्व या सगळ्या गोष्टींना कधी समजू शकणार नाही. जोपर्यंत तुमच्यासोबत हे सगळं घडत नाही, तो पर्यंत तुम्हाला कळणार नाही. तुम्ही विचार करत असाल की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक हुशार आहात. तर आयुष्यात तुमच्यासोबत असं काही होत नाही तोपर्यंत तुमच्यात नम्रता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात असं वाटतं.'

fallbacks

करीना कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना आता चिंता वाटत आहे की नेमकं काय झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे करीना कपूरनं लग्न आणि घटस्फोटाला टॅग केलं आहे. त्यामुळे सगळे विचारत आहेत की सगळं ठीक तर आहे ना. सैफ आणि तिच्यात काही झालेलं नाही ना.

हेही वाचा : संजय दत्तच्या नावावर महिला चाहतीनं केली 72 कोटींची संपत्ती; अभिनेत्याची एकूण नेटवर्थ माहितीये

करीना-सैफ थोडक्यात त्यांचं संपूर्ण कुटुंब हे तेव्हा चर्चेत आलं जेव्हा तिचा नवरा सैफ अली खानवर वांद्रेमध्ये असलेल्या त्यांच्या घरात चाकूनं हल्ला झाला. सैफवर तब्बल सहा सर्जरी करण्यात आल्या आणि सध्या त्यांची परिस्थिती ही ठीक आहे. तो रुग्णालयातून आता परतला आहे. अशात करीनानं केलेल्या या पोस्टनं सगळ्यांना धक्का बसला आहे. कारण या आधी तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं हा काळ तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी किती कठीण आहे असं सांगितलं होतं. 

Read More