Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिनाचा मुलगा बनणार फिल्म स्टार, आमीरचा मोठा निर्णय

चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी आधीच माझ्या डॉक्टरांशी बोलून घेतलं होतं. 

करिनाचा मुलगा बनणार फिल्म स्टार, आमीरचा मोठा निर्णय

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने एका मुलाखतीत तिच्या दुसऱ्या मुलासह गर्भवती असताना 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. जेह या जगात येण्यापूर्वी त्याने अनेक आठवडे दिल्लीत आमिर खानसोबत चित्रीकरण केल्याचं तिने म्हटले आहे. त्याच वेळी, तिने असेही म्हटले की तिचा मुलगा जेह देखील चित्रपटाच्या एका गाण्यात आहे. करीनाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये आपला दुसरा मुलगा जेह (जहांगीर) ला जन्म दिला.

गरोदरपणात करिनाने केलं चित्रपटाचं शूट 

करीना म्हणते, "आम्ही एका आरामदायी झोनमध्ये शूटिंग केली. मी दिल्लीहून पतौडीला यायचे. दररोज मी गाडीने दीड तास प्रवास करायचे आणि आम्ही रात्रीच्या वेळी चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण केले. या संपूर्ण काळात सैफ आणि तैमूर माझ्यासोबत होते. मी सैफला चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर माझ्याबरोबर येण्याची विनंती केली होती. कारण तैमूर चित्रपटाच्या सेटवर मला शूटींगसाठी नीट वेळ देईल."

शूटिंगसाठी डॉक्टरांचा सल्ला 

करीना पुढे म्हणते, "चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी आधीच माझ्या डॉक्टरांशी बोलून घेतलं होतं. त्यांनी मला नेहमी हात धुवायला सांगितले, कोरोनाव्हायरसच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क घालायला सांगितला. डॉक्टरांनी सांगितले की, दिवसा पुरेशी झोप घेतल्यानंतरच मी रात्री काम करु शकते , शुटींग करु शकते. "

Read More