Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kareena Kapoor आता तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? एकटीच या ठिकाणी स्पॉट

कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडताना बऱ्याचदा बॉलिवूड स्टार्स स्पॉट होत असतात.

  Kareena Kapoor आता तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? एकटीच या ठिकाणी स्पॉट

मुंबई : कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडताना बऱ्याचदा बॉलिवूड स्टार्स स्पॉट होत असतात. जेव्हा सेलिब्रिटी डिनर डेट किंवा एखाद्या फंक्शनमध्ये दिसतात तेव्हा त्यांच्या स्टाईलची आणि त्यांच्या वागण्याबाबतची बऱ्याचदा चर्चा होते.

सध्या अभिनेत्री कपूर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. करीना कपूर खान नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेली असता, तेथून बाहेर पडताना पापाराझींनी तिचे काही व्हिडिओ आणि फोटो काढले.ती यावेळी कॅमेऱ्यात कैद झाली.

सेलिब्रेटी फोटोग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करताच, नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये करीना कपूरला ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली आहे. कारण तिचे वजन खूपच वाढल्याचं नेटकरी बोलत आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'बेबोला पुन्हा फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे, तिचे वजन खूप वाढले आहे', तर दुसरा म्हणाला, 'मला आश्चर्य वाटते, कारण ती तैमूरनंतर अधिक फिट आणि बोल्ड होती..' 

समोर आलेल्या व्हिडिओमुळे काहींनी करिना पुन्हा प्रेग्नेंट आहे का? असा देखील प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. तिचं वाढलेलं पोट पाहता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट करायला सुरुवात झाली आहे.

करिनाने 2022 ची सुरुवातीला फिट राहायचं असं ठरवलं होतं. पण त्यानंतर ती या गोष्टींकडे फार लक्ष देताना दिसत नाहीये. करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर क्रोइसंट खाताना तिचा सेल्फी ही शेअर केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लवकरच करीना कपूर खान 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिर खानसोबत दिसणार आहे. अलीकडेच या सिनेमाची रिलीज डेट 11 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read More