Marathi News> मनोरंजन
Advertisement

दोन मुलांची आई Kareena Kapoor करतेय सरोगेसीचा विचार?

मूल हवं; करिनासमोर सैफची अजब अट....  

दोन मुलांची आई Kareena Kapoor करतेय सरोगेसीचा विचार?

मुंबई :  करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) बॉलिवूडच्या सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 2012 साली दोघांनी लग्न केलं. करीना आणि सैफला दोन मुलं आहेत. लग्नानंतर करीनाने 2016 मध्ये तैमूरला जन्म दिला, तर 2021 साली जेहचा जन्म झाला. पण दुसऱ्या मुलाचा विचार करताना सैफ आणि करीनाने सरोगेसीचा विचार केला. 

एका मुलाखीतत दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल करीना म्हणाली, 'मी आणि सैफ दुसऱ्या बाळाच्या वेळेस सरोगेसी पर्यायाचा विचार करत होतो. तेव्हा सैफ म्हणाला, जर आपण मुलांना जन्म देऊ शकतो. तर स्वतःचं ट्राय करण्यास हरकत काय?'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'जर देवाला वाटत असेल सरोगेसीच्या माध्यमातून दुसरं बाळ होईल तर ठिक आहे.... सैफला स्पष्ट होतं की त्याला नैसर्गिक प्रक्रियेतून मुलांचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या दोन मुलांचा जन्म हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. तो काळ माझ्या कायम लक्षात राहील.' असं देखील करीना म्हणाली. 

दरम्यान, आता दोन मुलांची आई असलेली करीना दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी सरोगेसीचा विचार करत होती. पण स्वत:च्या रक्ताचंच मुल हंव असल्याची अट सैफने करीनासमोर ठेवली होती. 

Read More