Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिना 'आपला माणूस'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सिनेमांपासून दूर असलेली दिसतेय. 'उडता पंजाब' सिनेमा नंतर तिला कोणत्या सिनेमात पाहता आलं नाही.

करिना 'आपला माणूस'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सिनेमांपासून दूर असलेली दिसतेय. 'उडता पंजाब' सिनेमा नंतर तिला कोणत्या सिनेमात पाहता आलं नाही.

प्रेग्नेंसी आणि तैमुरच बालपण यासाठी तिने काही वेळ काढून ठेवला होता. आता ती पुन्हा धकारेदार एन्ट्री करतेय.

वीरे दी वेडिंग 

साधारण एका वर्षानंतर करिनाने 'वीरे दी वेडिंग' ची शुटींग पूर्ण केलीय. या सिनेमात करिना सोबत स्वरा भास्कर, सोनम कपूर, सुमित व्यास आणि शिखा तलसानिया मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. १ जूनला हा सिनेमा रिलीज होतोय.

आपला माणूसचा हिंदी रिमेक 

'वीरे दी वेडिंग' नंतर तिच्यासमोर ४ सिनेमांच्या स्क्रिप्ट आहेत.

ज्यामध्ये मराठी हिट सिनेमा 'आपला माणूस' चा हिंदी रिमेक तिला जास्त आवडलाय. आशितोष गोवारीकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. एक महिला प्रधान सिनेमाही करिनाला आवडलाय. 

Read More