Marathi News> मनोरंजन
Advertisement

तैमुरच्या जन्मानंतर असं बदललं सैफ-करिनाचं आयुष्य

 तैमुरच्या जन्मानंतर मला कित्येक सिनेमांच्या ऑफर आल्या आणि येत असल्याचे ती म्हणाली. 

तैमुरच्या जन्मानंतर असं बदललं सैफ-करिनाचं आयुष्य

मुंबई : तैमुर संदर्भातल्या बातम्या वाचणं काहींना बऱ्याचदा आवडत नाही. अशा बातम्यांवर अनेकजण राग व्यक्त करताना दिसतात. पण अनेकांना दीड वर्षाच्या तैमुर बद्दल उत्सुकताही असते. हे काहीही असलं तरी तैमुरच्या जन्मानंतर सैफ करिना या बॉलीवुड स्टार्सच्या आयुष्यात खूप मोठा बदल झालायं. या बदलाबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. एका मुलाखती दरम्यान करिनाने यासंदर्भातील खुलासा केला. लग्नानंतर मुलींच करिअर संपत असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं त्याप्रमाणे मलाही काम मिळणार नाही असं अनेकांना वाटतं होत असं करिनाने सांगितलं. पण अनेकांचा हा संभ्रम मी मोडीत काढला.लग्न आणि तैमुरच्या जन्मानंतर मला कित्येक सिनेमांच्या ऑफर आल्या आणि येत असल्याचे ती म्हणाली. पण आपल्या १७ महिन्याच्या तैमुरसाठी मी एका वर्षात एकच सिनेमा करणार असल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

एकत्र शूट नाही 

सैफ आणि करिना एकत्र शूटींग करत नाहीत असेही नेहमी म्हटले जाते. पण हे सर्व तैमुरसाठी होत असल्याचे तिने सांगितले. करिनाचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सैफ आपल्या सिनेमाचे शूटींग लवकरच सुरू करणार आहे. 'वीरे दी वेडिंग' आधी करिना तैमुरची काळजी घेत होती. तेव्हा सैफ आपला 'शेफ' या सिनेमामध्ये बिझी होता.  शूटींगच्या वेळात समोतल राखण्याचे आम्ही ठरवल्याचे तिने सांगितले.सध्या ती सैफ आणि तैमुरसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय.

Read More