Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिनाला 'बच्ची' मानतो सलमान, कपूर बहिणींमध्ये कोण जास्त जवळचं ?

या दोघींमध्ये त्याच्या सर्वात जवळ कोण आहे याबद्दल कदाचित तुम्हाला माहित नसेल. कपूर बहिणींपैकी एकीने याबद्दल खुलास केलाय.

 करिनाला 'बच्ची' मानतो सलमान, कपूर बहिणींमध्ये कोण जास्त जवळचं ?

मुंबई : करिश्मा आणि करिना कपूर दोन्ही बहिणींनी सलमान खानसोबत बॉलीवूडचे खूप सिनेमा केले आहेत. पण या दोघींमध्ये त्याच्या सर्वात जवळ कोण आहे याबद्दल कदाचित तुम्हाला माहित नसेल. कपूर बहिणींपैकी एकीने याबद्दल खुलास केलाय. टीव्ही शो 'एंटरटेन्मेंट की रात- लिमिटेड एडिशन' करिश्मा कपूर पोहोचली होती. यावेळी तिने खूप साऱ्या गप्पा मारल्या. करिनापेक्षा आपण सलमानच्या जास्त जवळचे असल्याचे तिने यावेळी सांगितले. आमची मैत्री खूप वर्षांपासूनची आहे. करिनाच्या तुलनेत सलमान माझ्या जास्त जवळ असल्याचे करिश्मा म्हणते. सलमानसाठी करिना छोट्या बहिणीसारखी आहे तर मला तो एक लहान मुलगी मानतो. करिश्मा आणि सलमान १९९० मध्ये सर्वांच्या आवडती जोडी होती. दोघांनी 'अंदाज अपना अपना', 'बीवी नंबर १', 'जीत' आणि 'जुडवा' सारख्या सुपरहिट सिनेमा दिले. करिश्माच्या छोटी बहिण करिनासोबत त्याने बजरंगी भाईजान, क्योंकी, बॉडीगार्ड असे सिनेमा केले.

मम्मी नंबर १ 

आता कोणत्या प्रकारचे सिनेमा करायला आवडतील असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. नंबर १ नावाचे सर्व सिनेमा केल्यानंतर आता 'मम्मी नंबर १' सिनेमाचा भाग बनायचे असल्याचे तिने सांगितले. या सिनेमाचा भाग बनल्यास आनंद होईल असे तिनं सांगितल. 

Read More