Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिश्मा कपूरच्या सवतीसोबत लग्न बंधनात अडकणार प्रसिद्ध अभिनेता!

करिश्मा कपूरच्या सवतीला लगीन घाई... अनेक वर्ष प्रसिद्ध अभिनेत्याला डेट केल्यानंतर अडकणार विवाह बंधनात!  

करिश्मा कपूरच्या सवतीसोबत लग्न बंधनात अडकणार प्रसिद्ध अभिनेता!

मुंबई : बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना अभिनेत्री करिश्मा कपूरची सवत नंदिता माहतानी देखील विवाह बंधनात अडकणार आहे. नंदिता माहतानी अभिनेता विद्यूत जामवालसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यूत  आणि नंदिता एकमेकांना डेट करत आहेत. नंदिता महतानी सध्या लंडनमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत जामवाल देखील लंडनला जाणार असल्याचं कळत आहे.

एवढंच नाही तर, विद्यूत आणि नंदिताने लग्न केल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यांच्या लग्नाबद्दल फक्त दोघांच्या मित्र मंडळींना माहिती आहे. शिवाय योग्य वेळ आल्यानंतर विद्यूत आणि नंदिता सर्वांसमोर लग्नाच्या वृत्ताला दुजोरा देतील असं सांगण्यात येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यामुळे विद्यूत आणि नंदिता यांचं खरंच लग्न झालं आहे, की लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  दरम्यान, सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट केले आहेत. पण विद्यूत आणि नंदिताने त्यांच्या नात्यावर कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही.  

नंदिताचं करिष्मासोबत काय आहे नात?
नंदिता एक फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींचे कपडे डिझाईन केले आहेत. नंदिता माहतानी संजय कपूरची पहिली पत्नी आहे. नंदितापासून विभक्त झाल्यानंतर संजयने करिष्मा कपूरसोबत लग्न केलं. पण त्यांचं नात देखील जास्त काळ टिकलं नाही. 

 

 

 

Read More