Karishma Kapur Husband Sanjay's Last Video : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर याचं 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. 53 वर्षाीय संजय कपूरचं पोलो खेळताना मैदानातच निधन झालं. त्यानं पोलो खेळताना मधमाशी गिळली. त्यानं पोलो मॅचमध्ये थांबवली आणि सांगितलं की त्यानं काही तरी गिळलं आहे. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली आणि त्यामुळे त्याला हार्ट अटॅक झाला आहे. आता संजय कपूरच्या निधनाच्या 8-9 दिवसानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. संजय कपूरचा हा शेवटचा व्हिडीओ समोर आल्याचं म्हटलं जात आहे.
या व्हिडीओला भारतीय हॉकी टीमचा माजी खेळाडू आणि संजय कपूरचे मित्र अजित नांदल यांनी त्यांच्या ट्विटर अर्थात X अकाऊंटवरून शेअर केला आहे. दोघं एकत्रच पोलो खेळत होते. अजितनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की 'संजय कपूरचा अखेरचा रेस्क्यू व्हिडीओ. सज्जन जैसल आणि संजय टीममध्ये सामना रंगला होता. सज्जन देखील तिथेच होता.'
हा व्हिडीओ कथितपणे यूकेचा आहे. ज्यात एक व्यक्ती जमीनीवर बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही आहे. पण संजयचा मित्र अजीतनं सांगितलं की हा संजय कपूर होता. जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला CPR देण्यात येत आहे. तर हा व्हिडीओ खरंच संजय कपूरचा आहे याची काही अधिकृत माहिती नाही. पण मैदानात तेच चित्र दिसतं जे संजय कपूरच्या निधनाचं कारण असल्याचं पाहायला मिळालं होतं. संजयच्या मित्रानं शेअर केलेल्या पोस्टनुसार, त्या दिवशी संजय कपूरची टीम आणि सज्जन जैसलच्या टीममध्ये हा सामना रंगला होता.
Last rescue video of Sanjay Kapoor match between Sajjan jaisal and Sanjay team,sujjan also there
— Ajit Nandal Indian Cowboy (@AjitNandal) June 14, 2025
Very sad time for all horse lovers, Rest in peace my friend #sanjaykapoor #polo pic.twitter.com/vWHWFFoqqg
संजय कपूरचं अचानक निधन झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. कोणी विचार केला नसेल की एका मधमाशीमुळे कोणत्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. 19 जून रोजी दिल्लीत संजय कपूरच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. त्यावेळी त्याची पत्नी प्रिया सचदेवशिवाय पूर्वाश्रमीची पत्नी करिश्मा कपूर आणि तिचे दोन्ही मुलं दिसले. तर वडिलांचं हे अंतिम दर्शन करताना कियान आणि समायरा यांना अश्रू अनावर झाले. तर करिश्मा देखील भावूक झाली होती. 20 जून रोजी करिश्मा तिच्या दोन्ही मुलांना घेऊन मुंबईत परतली.
हेही वाचा : 'मन्नत'चं रेनोव्हेशन BMC च्या रडारवर; शाहरुखच्या घरी पोहोचली अधिकाऱ्यांची टीम अन्...
संजय कपूर आणि करिश्मा कपूरचा 2016 मध्ये घटस्फोट झाला आणि दोन्ही मुलांची कस्टडी ही करिश्माला मिळाली होती. संजयनं दोन्ही मुलांसाठी 14 कोटी रुपयांचा बॉन्ड खरेदी केला आहे. ज्यामुळे दर महिन्याला 10 लाख रुपये व्याज मिळतं. तर वडिलांचा बंगला करिश्माच्या नावावर करण्यात आला आहे. करिश्माजवळ मुलाची कस्टडी असण्यासोबत संजय त्यांना भेटायचा आणि त्यांच्या जवळचा देखील होता.