Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिष्मा कपूरच्या मुलीची सोशल मीडियात चर्चा

अभिनेत्री करिष्मा कपूर ही 90च्या दशकातील आघडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. 

करिष्मा कपूरच्या मुलीची सोशल मीडियात चर्चा

मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूर ही 90च्या दशकातील आघडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. कालांतर घर आणि संसारामध्ये रमलेल्या करिष्माने बॉलिवूडमध्ये काही निवडक सिनेमे केले. संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिष्मा सध्या तिच्या मुलांसोबत राहते.  कियांन आणि समायरा ही करिष्माची दोन्ही मुलं तिच्यासोबत राहतात. करिष्मा सिनेसृष्टीमध्ये क्वचित दिसत असली तरीही तिची मुलगी लवकरच सिनेसृष्टीमध्ये प्रवेश करणार आहे.  

 सोशल मीडियामध्ये फोटो व्हायरल 

 

 अनेक पार्टींमध्ये करिष्मा कपूर आणि तिची समायरा एकत्र दिसत सहभागी होतात. सध्या समायरा कपूरचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. समायरा ही आईची कॉपी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. समायराच्या अंदाजाचीही सोशल मीडियात चर्चा आहे. 

समायराचा भाऊ तैमुर अली खानचीदेखील मीडियामध्ये नेहमीच चर्चा होते. तैमुरच्या क्युटनेसवर अनेकजण फिदा आहेत. त्यामुळे तैमुरही चित्रपटात दिसेल अशा चर्चा  नेहमीच होतात. मात्र समायरा किंवा तैमुरच्या सिनेसृष्टीतील प्रवेशाबददल अजून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

Read More